भारतीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यावर एक कसोटी, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळवले गेले. मार्च २०२५ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) ने २०२५ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.
सप्टेंबर २०२५ मध्ये, मेलबर्नमधील फ्लडलाइट्सच्या समस्येमुळे तिसरा एकदिवसीय सामना मेलबर्नहून होबार्टला हलवण्यात आला होता.
२०२५ आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या विजयानंतर, माजी मंत्री सल्लागार श्री. नितीन गुप्ता आणि ऑस्ट्रेलियन भारतीय समुदायाच्या इतर सदस्यांनी व्हिक्टोरियन सरकारला मेलबर्न क्रिकेट मैदानावर किंवा व्हिक्टोरियामध्ये कुठेतरी किमान एक सामना आयोजित करण्याचा प्रयत्न करण्याची विनंती केली. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी छाया मंत्री (Shadow Minister) इव्हान मुलहोलँड यांनी व्हिक्टोरियन संसदेत हा मुद्दा उपस्थित केला आणि व्हिक्टोरिया सरकारला एकही सामना मिळविण्यात अपयशी ठरल्याबद्दल टीका केली.
आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेमध्ये भारताने २-१ ने विजय मिळवला. मायदेशातील द्विपक्षीय मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाचा हा २०१७ नंतर पहिलाच पराभव होता.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेत भारताला ३-० असा पराभव स्वीकारावा लागला. मालिकेतील तीनही सामने ऑस्ट्रेलियाने सहज जिंकले.
अगदीच एकतर्फी झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताला दारुण पराभव स्विकारावा लागला. भारताचा पहिला डाव १९८ धावांवर आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सर्वबाद ३२३ धावा करून १२५ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात प्रतिका रावळ (६३) आणि स्नेह राणा (३०) ह्या दोघींनी काहीसा विरोध केल्याने भारताने डावाचा पराभव टाळला. अवघ्या २८ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमावता केवळ ४.३ षटकांमध्ये पार केले.
भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२५–२६
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.