भारतातील पर्वतीय रेल्वे या भारतातील पर्वतीय प्रदेशात बांधण्यात आलेले रेल्वेमार्ग आहेत. हे प्रामुख्याने या प्रदेशांमधील नॅरो-गेज आणि मीटर-गेज रेल्वेमार्ग आहे परंतु काही ब्रॉड-गेज रेल्वेचा देखील समावेश असू शकतो.
ह्यातील तीन मार्ग: दार्जीलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे आणि कालका−सिमला रेल्वे, एकत्रितपणे "भारतातील पर्वतीय रेल्वे" या नावाने युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केल्या आहेत. आणखी दोन, म्हणजे माथेरान डोंगरी रेल्वे आणि कांगडा व्हॅली रेल्वे, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत आहेत. निलगिरी माउंटन रेल्वे ही भारतातील एकमेव रॅक आणि पिनियन रेल्वे आहे.
भारतातील पर्वतीय रेल्वे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.