भारतीय रेल्वे

या विषयावर तज्ञ बना.

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे (संक्षेप: भा.रे.) ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतातील रेल्वेमार्गांची एकूण लांबी ६७,४१५ कि.मी. इतकी आहे. भारतीय रेल्वे दररोज २३१ लाख प्रवासी आणि ३३ लाख टन मालाची वाहतूक करते. भारतीय रेल्वेच्या मालकीत भारतीय रेल्वेमध्ये १२,१४७ इंजिने, ७४,००३ प्रवासी डबे आणि २८९,१८५ वाघिणी आहेत आणि रोज ८,७०२ प्रवासी गाड्यांसहित एकूण १३,५२३ गाड्या धावतात. भारतीय रेल्वेची ३०० रेल्वे यार्डे, २,३०० मालधक्के आणि ७०० दुरुस्ती केंद्रे आहेत. ही रेल्वे जगातील चौथी सर्वांत मोठ्या रेल्वेसेवा आहे. १२.२७ लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे, कर्मचारीसंख्येत जगातील आठवी सर्वांत मोठी व्यावसायिक संस्था आहे. रेल्वे विभाग हा भारत सरकारच्या कें‍द्रीय रेल्वे खात्यातील विभाग, भारतातील संपूर्ण रेल्वे जाळ्याचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे कामकाज कॅबिनेट दर्जाचे रेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते. ही जगातील सर्वांत मोठ्या संस्थांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →