ब्रेट ली

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

ब्रेट ली

ब्रेट ली (नोव्हेंबर ८, इ.स. १९७६) हा एक माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. लीला जगातील सर्वात जलद गोलंदाजापैकी एक मानले जाते. पदार्पणा नंतर सातत्याने २ वर्ष त्याने गोलंदाजी सरासरी २० चेंडू पेक्षा कमी ठेवली.

ली उत्तम क्षेत्ररक्षक तसेच चांगला लोवर ऑर्डर फलंदाज आहे. कसोटी सामन्यांमध्ये त्याची फलंदाजी सरासरी २० पेक्षा जास्त आहे. मायकल हसी सोबत १२३ धावांची सातव्या गड्यासाठी त्याची ऑस्ट्रेलियन संघासाठी विकमी भागीदारी आहे.

लीचे उपाख्य 'बिंगा', न्यू साउथ वेल्स मधील बिंग ली ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तुच्या दुकानांवरून पडले.

ब्रेट ली कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी आयपीएल मध्ये खेळतो.

१३ जुलै, २०१२ रोजी ऑस्ट्रेलियन संघाच्या इंग्लंड दौऱ्या दरम्यान झालेल्या दुखापती नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधुन संन्यास घेण्याचे घोषित केले. ली आयपीएल तसेच बिग बॅश लीग खेळत राहील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →