ब्रेकेनरिज शहर हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. होमरुल नगरपालिका असलेले हे शहर समिट काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. हे शहर नगरपालिका पातळीवरचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५,०७८. हे शहर टेनमाइल रेंज या पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेले आहे.
१९६१ मध्ये ब्रेकेनरिज जवळ पहिल्यांना स्की वाटा तयार करण्यात आल्या. तेव्हापासून ब्रेकनरिज स्की रिसॉर्टमुळे हे शहर स्की करणाऱ्यांमध्ये एक प्रिय गंतव्यस्थान झाले आहे. येथे उन्हाळ्यात डोंगरवाटा, रानफुले, फ्लाय-फिशिंग, डोंगरी सायकलिंग, तळ्यातील नौकानयन, व्हाइट वॉटर राफ्टिंग, इ. अनेक आकर्षणे प्रवाशांना खेचतात. शहरात अनेक दुकाने आणि रेस्टॉरंट्सही येथे प्रवासी आणतात. १९८१पासून सप्टेंबरमध्ये येथे ब्रेकेनरिज चित्रपट महोत्सव भरवला जातो. याशिवाय २००० च्या सुमारापासून दरवर्षी जानेवारीमध्ये बॅककंट्री चित्रपट महोत्सव होतो. याच वेळी नॉर्स देव उल्लरच्या नावची जत्राही येथे असते.
ब्रेकेनरिज शहराची स्थापना नोव्हेंबर १८५९ मध्ये झाली. या शहराला थॉमस ब्रेकेनरिज या सोनेशोधकाचे नाव देण्यात आले आहे. १८६० मध्ये, जनरल जॉर्ज ई. स्पेन्सर याने शहरात टपाल कार्यालय सुरू होईल या अदमासाने शहराचे नाव तत्कालीन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जॉन कॅबेल ब्रेकिन्रिज यांच्या नावे शहराच्या नावाचे शुद्धलेख बदलून ब्रेकिन्रिज असे केले. हा बदल कामास येऊन ब्रेकिन्रिज पोस्ट ऑफिस हे कॉन्टिनेंटल डिव्हाइड आणि सॉल्ट लेक सिटी दरम्यानचे एकमेव पोस्ट ऑफिस झाले. १८६१ मध्ये जेव्हा ब्रेकिन्रिज कॉन्फेडरेट स्टेट्स आर्मीमध्ये ब्रिगेडियर जनरल म्हणून दाखल झाला तेव्हा शहराने आपले नाव लगेच बदलून मूळचे असे ब्रेकेनरिज केले.
ब्रेकेनरिज (कॉलोराडो)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.