बौद्ध कलेची सुरुवात गौतम बुद्धांच्या जीवन आणि शिकवणुकीला समाजात रुजवण्यासाठी इ.स.पूर्व ५-६ व्या शतकांत जम्बूद्विपामध्ये झाली. त्यानंतर अनेक ठिकाणी स्थानिक संस्कृतींसह तिचा झपाट्याने विकास होऊन ती आशिया तसेच जगात इतर ठिकाणी पसरली. बौद्ध कलेमध्ये मुख्यतः विविध प्रकारची बुद्ध विहारे, लेण्या, दगडावरील कोरीव चिन्हे, बुद्धांच्या विविध मुद्रा व प्रतिमांचा समावेश होतो. जसजसा बौद्ध धर्माचा प्रसार होत गेला तसतशी बौद्ध कलेच्या विकासाला गती मिळत गेली. बौद्ध कलेचा विकास मुख्यतः दोन शाखांमध्ये झाला. उत्तर शाखा; ज्यामध्ये मध्य आशियातून उत्तरेकडे तसेच पूर्व एशियाकडे आणि दक्षिण शाखा; ज्यामध्ये पूर्व तसेच दक्षिण-पूर्व एशियात बौद्ध कला पसरली.
भारतामध्ये बौद्ध कलेचा विकास इ.स. तिसऱ्या शतकापर्यंत झपाट्याने होत गेला. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार करून संपूर्ण भारतामध्ये (सध्याचा भारत, बांगलादेश, नेपाल, पाकिस्तान व अफगाणिस्तान) ८१,०००
पेक्षा जास्त बुद्ध विहार, बुद्ध स्तूप व लेण्यांची निर्मिती केली. परंतु सम्राट अशोकानंतर ५० वर्षांनी पुष्यमित्र शुंग या ब्राह्मण राज्यमंत्रांने राजसिंहासन हस्तगत करून मौर्य साम्राज्याचा व बौद्ध कलांचा नायनाट केला व बौद्ध कला भारतातून नाहीशी केली. परंतु उत्खननामध्ये सापडणारी अजिंठा-वेरूळ सारखी लेणी आजही भारतातील बौद्ध कला व इतिहासाची साक्ष देतात.
बौद्ध कलेचे इ.स.पूर्व १ ल्या शतकापासूनचे पुरावे सापडतात. बिहारमधील बोध गया येथील महाबोधी विहारापासून प्रेरणा घेऊन म्यानमार आणि इंडोनेशियात अनेक रचना करण्यात आल्या. श्रीलंकेतील साइगीरीया (Saigiriya) येथील चित्रकला ही अजिंठ्याच्या लेणीतील चित्रकलेपेक्षा जुनी असल्याचे म्हणले जाते.
इ.स. पूर्व पहिल्या-दुसऱ्या शतकात शिल्पकला ही बुद्धाचं जीवन आणि त्याची शिकवणूक प्रदर्शित करण्याचं महत्त्वाचे साधन बनली. मुख्यतः स्तुपांना सजवण्यासाठी शिल्पकलेचा वापर करण्यात आला. भारताला उत्तम शिल्पकला व मुर्तीकलेची फार मोठी परंपरा लाभली असताना देखील बुद्धाला मानवी रूपात कधीही दाखवलं गेलं नाही, फक्त बौद्ध चिन्हांचाच वापर करण्यात आला. बुद्धाला फक्त चिन्हांच्या रूपातच दाखवण्यात आलं जसे की रिकामा दगड, बोधी वृक्ष, सारथ्याविना घोडा (सांचीमध्ये) बुद्धाचे पदचिन्ह किंवा धर्मचक्र इत्यादी. याचे कारण असे की, स्वतः बुद्ध मुर्तीपूजेचे विरोधक होते. ही प्रथा इ.स. दुसऱ्या शतकापर्यंत अशीच चालू राहीली ,ज्याचे पूरावे दक्षिण भारतातील अमरावती शाळेत सापडतात.
बौद्ध कला
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.