गांधार बौद्ध कला

यामागील विज्ञान आणि इतिहास.

गांधार बौद्ध कला (ग्रीको–बुद्धिष्ट आर्ट्स) म्हणजे गौतम बुद्ध यांचे कलात्मक पद्दतीने प्रगटीकरण करण्याची कला आहे. साधारण १००० वर्षापूर्वी मध्य आशिया खंडात ग्रीक आणि बौद्ध संस्कृतीचा विकास कृत्रिम रित्या झाला होता. इ.सन पूर्व ४थ्या शतकात अलेक्झांडर द ग्रेट याने विजय संपादन केल्यानंतर आणि ७व्या शतकात इस्लामिकांनी विजय प्राप्त केल्यानंतर त्यांनी बौद्ध कलेला विकशीत केले. प्रथमतः ही आदर्शवादी धर्मीय आणि ज्ञानेंद्रियांना समाधान देणारी आणि सुखद वाटणारी कला ग्रीक समुदायाने आपलीशी केली. त्यांनी अतिशय भक्कम रीतीने बुद्धांचे जीवनातील अनेक पैलू चित्रमय पद्दतीने समोर ठेवून गौतम बुद्धांचे व या कलेचे दर्शन घडविले. सध्या पूर्ण एशिया खंडात पदोपदी या कलेचे दर्शन घडते. पूर्ण गोलार्धातील पूर्व आणि पश्चिम परंपरागत संस्कृतिक कलात्मकतेचे दर्शन घडविणारी ही एक कला म्हणजे उत्तम उदाहरण आहे.

या कलेचे मूळं शोधले तर इ.सण पुर्व २३०-१३० दरम्यान ग्रीक मधील ग्रेको बाकट्रीयन राज्यात या कलेचा शोध मिळतो. सध्या ही अफगाणिस्थानात पाहता येते. येथून ही कला इ.सण पूर्व १८०-१० या काळात भारत देशात व या उपखंडात वाहावत आली आणि स्थिर झाली. ग्रीक आणि बौद्ध यांची चर्चा झाली आणि त्यानंतर कुशनला बरोबर घेऊन ही कला सध्याच्या उत्तर पाकिस्तानातील गांधार येथे प्रसारित झाली. या जवळीकतेने त्याचा परिणाम असा झाला की ही कला मथुरा,पर्यंत पसरली. त्यानंतर हिंदू गुप्त राजाचे राजवटीत ही कला दक्षिण आणि पूर्व एशिया मध्ये ही पोहचली. ही कला तेथेच थांबली नाही तर ती मध्य एशिया पर्यंत पसरली आणि नंतर ती तरिम बेसिन व पुढे चायना,कोरिया,जपान पर्यंत पोहचली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →