सिरॅमिक आर्ट

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

चिकन माती आणि इतर आवश्यक बाबींचे मिश्रण करून विविध प्रकारच्या वस्तु बनविन्याची ही सिरॅमिक आर्ट आहे. कलाकुसरीच्या वस्तु, भांडी, खेळणी, नक्षीदार मंदिरे, वेगवेगळ्या आकाराचे रंगिण मणी, रंगिण नक्षीदार कौले, मेजवर ठेवण्याच्या नक्षीदार वस्तु, विटा यांचा यात समावेश होतो. अनेक कला पैकी कुंभार कला ही एक अशी कला आहे की तिच्यात वस्तूला हवे तसे आकार देता येतात आणि हवी तशी नक्षीदार वस्तु तयार करता येते आणि त्या वस्तु दर्शनीय बनविता येतात. यासाठी तो सूत आणि माती पासून चाक बनवितो. ते जमिनीवर एक आरी ठोकून त्यावर आडवे ठेवतो आणि माती व इतर मिश्रणाचा चिखल करून तो त्या चाकावर ठेवून त्याला गोल फिरवितो व गती देतो आणि हवी तशा आकाराची वस्तु बनवितो त्या वस्तु भट्टीत (आवा) भाजून विक्रीसाठी तयार करतो. कुंभार सुंदर वस्तु बनव ण्याबाबत काळजीपूर्वक खूप विचार करतात तसेच व्यावसायिक दृष्टीने दिमाखदार वस्तु कशा बनवता येतील शिवाय व्यवहारोपयोगी कशा बनवता येतील याचा विचार करतात. या कला कुसरीच्या किंवा इतर वस्तु बनविण्याचे काम स्वतंत्रपणे किंवा संघटित केले जाते. कुंभाराच्या कारखान्यात किंवा सैरमिक खारखान्यात संघटित लोक विक्रीला योग्य अशा वस्तूंचे आकार तयार करणे, दिमाखदार वस्तु तयार करणे ही कामे करतात. तयार झालेला कलात्मक माल कुंभाराच्या कारखान्यातील आहे अशी जाहिरात केली जाते.

सिरॅमिक हा शब्द ग्रीक केरमिकोस म्हणजे पोट्टेरी पासून आलेला आहे. नंतर त्याचे रूपांतर पोट्टेरीस क्ले मध्ये झाले आहे. अलीकडील आधुनिक काळात या कामात खूप बदल झाला. तांत्रिक नियोजन आत्मसात झाले त्याने निर्जीव, अधातुक वस्तूंचा उपयोग होऊ लागला आणि त्याला उष्णता देऊन पाघळवतात व त्यापासून वस्तु बनवितात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →