सोने

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सोने

सोने (सुवर्ण, स्वर्ण, कनक, हेम) हा एक मौल्यवान धातू आहे. सोने हे मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक ७९ आहे (संज्ञा Au). चकाकी असलेला आणि सहज आकार देण्याजोगा मऊ धातू असल्याने सोन्याचा दागिन्यांमध्ये वापर होतो. जुन्या काळी सोन्याची नाणी प्रचारात होती. सोने हे समाजात प्रतिष्ठा वाढवणारी अशी वस्तू समजली जाते. सोने हे खाणीत मिळते.



जगातील सर्व चलनांची तुलना सोन्याच्या किंमतीशी केली जाते, त्यामुळे सोन्याला अचल चलन असेही म्हणतात. सोन्याकडे एक सुरक्षित व निश्चित लाभ देणारी गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. अर्थव्यवस्थेला स्थैर्य यावे म्हणून देश सोन्याचा साठा करतात. सोने उत्तम विद्युत्‌वाहक आहे. ते कधीही गंजत नाही. त्यापासून सुतासारख्या तारा (जर) किंवा पातळ पत्रा बनवता येतो.

भारतासह जगातील इतर सर्व संस्कृतीमध्ये विशेष करून महिला सोन्याचे दागिने परिधान करताना दिसतात. भारतामध्ये सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर दागिने हे सौभाग्याचे लेणे समजतात. सोन्याचे आयुर्वेदिक महत्त्वही खूप मोठे आहे. सोने शरीरावर परिधान केल्याचे अनेक फायदे आहेत. तत्कालीन लोकांना शास्त्रीय पद्धतीने हे सांगितले असते तर त्यांना ते समजले नसते. म्हणूनच की काय त्याला धर्माची जोड दिली गेलीं असावी. परंतु, सोन्याचे दागिने परिधान केल्यामुळे भारतीय स्त्रियांचे आरोग्य चांगले राहाते, यात मात्र शंका नाही.

भारतात आजही गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी अनेक घरात केली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →