कॉफी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

कॉफी

कॉफी हे एक पेय आहे.

कॉफी हे जगभर खप असलेले, तरतरी आणणारे, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय आहे. रुबिएसी कुलातील कॉफिया प्रजातीमध्ये असलेल्या वृक्षांच्या फळांतील बियांपासून कॉफीची भुकटी बनवितात. कॉफी वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॉफिया अरॅबिका असे आहे. कॉफे पाउडर बनवण्या साठी कॉफी बीन्स रोअस्त करून बारीक करा. या जातींची लागवड जगाच्या विविध भागांत होते. कॉफी मूळची आफ्रिकेतील असून पंधराव्या शतकात ती इथिओपियातून अरबस्तानात आणली गेली. त्यानंतर मध्य आशियातील ठिकाणांहून तिचा प्रसार यूरोपात साधारणत: सोळाव्या आणि सतराव्या शतकांत झाला. याच सुमारास जावा व इतर बेटे आणि नंतर ब्राझील, जमेका, क्यूबा, मेक्सिको या उष्णकटिबंधातील प्रदेशांत तिचा प्रसार झाला.तुर्कस्तान येथील टर्किश कॉफी ही एक वेगळीच मजा देणारी कॉफी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →