श्रीपाद वैद्य हे 'पर्यावरणीय मानव विकास' या विषयाचे जनक, सर्वप्रथम व्याख्याकर्ता ऑथर, रिसर्च चँपियन व ॲडव्होकेट आहेत. ते पर्यावरणवादी, लेखक, कवी व नवनिर्मितिकारसुद्धा आहेत.
पर्यावरणीय मानव विकास या विषयाच्या व्याख्येच्या अनुशंगाने पाणी, अन्न, ऊर्जा, नवनवीन खेळ, नवनिर्मिती, इकोवरशिप, विज्ञान, साहित्य, लेखन, कला, इत्यादी सारख्या पर्यावरणीय मानव विकासात महत्त्वाच्या ठरणाऱ्या बाबींमध्ये त्यांनी केलेले विक्रम व उपाययाेजना जनतेला योग्य दिशा दाखवून जनजागृती करतात. ते या क्षेत्रातील अग्रणी रेकॉ़र्ड सेटर आहेत. 'पर्यावरणीय मानव विकास' या क्षेत्रातील त्यांच्या निःस्वार्थ योगदानासाठी त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या शंभराहून अधिक, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील विक्रमांनी पर्यावरणीय मानव विकासाच्या कार्यात भर पडली आहे. . मानवी जीवनाला सुखी, समृद्ध व सक्षम करणारी पर्यावरणीय मानव विकासाची नवी दिशा त्यांनी दाखविली. १९९३ पासून आजतागायत ते निरपेक्षपणे पर्यावरणीय मानव विकासासाठी प्रचार, प्रसार व संशोधनातून सातत्यपूर्ण योगदान देत आले असून त्यांनी या संबंधित ज्ञान 'सा विद्या या विमुक्तये' (The knowledge is that which liberates) या उक्तीनुसार सर्वांसाठी मुक्त करून विविध माध्यमांद्वारे जगभरात प्रसिद्ध केलेले आहे.
श्रीपाद वैद्य
थोडक्यात पण महत्त्वाचे.