बोलोन्या

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

बोलोन्या

बोलोन्या (इटालियन: Bologna; उच्चार ; लॅटिन: Bononia) ही इटली देशाच्या एमिलिया-रोमान्या ह्या प्रदेशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. इटलीच्या उत्तर भागात वसलेले व सुमारे २.८४ लाख लोकसंख्या असलेले बोलोन्या हे इटलीमधील सातव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. इ.स. १०८८ साली स्थापन झालेले येथील बोलोन्या विद्यापीठ जगातील सर्वांत जुने विद्यापीठ मानले जाते.

सध्या बोलोन्या हे उत्तर इटलीमधील कला व संस्कृतीचे माहेरघर मानले जाते. २००० साली बोलोन्या युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते. बोलोन्या हे इटलीमधील सर्वांत सुबत्त शहरांपैकी एक असून येथील राहणीमानाचा दर्जा इटलीमध्ये सर्वोत्तम आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →