बोईंग ७०७ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान होते.
चार इंजिने असलेले हे विमान बोईंगने १९५० च्या दशकात विकसीत केले. या विमानाच्या १,०१० प्रतिकृती विकण्यात आल्या. आर्थिकदृष्ट्या सफल झालेल्या पहिल्या काही जेट विमानांपैकी ७०७ (सेव्हेन ओह सेव्हेन) होते. या विमानाने बोईंगला विमान उत्पादकांत अग्रगण्य स्थान दिले व बोईंगच्या ७x७ प्रकारच्या विमानांची सुरुवात करून दिली.
या विमानाचा छोटा आणि अधिक वेगवान उपप्रकार बोईंग ७२० नावाने विकण्यात आला होता.
बोईंग ७०७
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.