बोईंग ७४७ हे बोईंग कंपनीचे खूप मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. जगातील लगेच ओळखल्या जाणाऱ्या काही विमानांपैकी हे एक आहे अमेरिकेच्या सियॅटल शहराजवळील एव्हरेट येथे तयार करण्यात येणारे हे विमान जगातील पहिले रुंदाकार आणि दोनमजली विमान आहे. बोईंग ७४७ किंवा जंबो जेट तत्कालीन मोठ्या विमानापेक्षा (बोईंग ७०७) अडीचपट क्षमतेचे होते. इ.स. १९७०मध्ये प्रवासी सेवेत रूजू झालेल्या विमानाच्या क्षमतेचा विक्रम एरबस ए-३८०च्या अवतरणापर्यंत ३७ वर्षे अबाधित होता.
चार जेट इंजिने असलेल्या या विमानाचा पुढील भाग दोन मजली आहे. हे विमान पूर्ण प्रवासी, मालवाहू किंवा दोन्ही एकातच असलेल्या उपप्रकारात तयार केले जाते. हे विमान तयार करताना बोईंगने मालवाहतुकीसाठी या विमानाचा वापर जास्त होईल असे भाकित केले होते व ४०० प्रति विकल्यावर दुसऱ्या प्रकारच्या विमानांचा खप वाढेल असा अंदाज होता. प्रत्यक्षात हे विमान लोकप्रिय ठरले व १९९३मध्ये १,०००वे ७४७ विकले गेले. जून २००९पर्यंत या विमानाचे १,४१६ नग विकले गेले आहेत व अजून १०७ नगांची मागणी आहे.
बोईंग ७४७-४०० हा सगळ्यात नवीन उपप्रकार जगातील अतिवेगवान प्रवासी विमानांपैकी एक आहे. याची उच्च-अस्वनातीत क्रुझगती .८५ माख (ताशी ५६७ मैल किंवा ताशी ९३७ किमी) आहे. याचा पल्ला ७,२६० समुद्री मैल (८,३५० मैल किंवा १३,४५० किमी) आहे. ७४७-४०० प्रकारच्या प्रवासी विमानात सहसा ४१६ व्यक्ती तीन वर्गात प्रवास करतात तर दोन वर्गांचे विमान ५२४ प्रवासी नेऊ शकते. याचा पुढचा उपप्रकार ७४७-८ २०१२मध्ये लुफ्तांसातर्फे प्रवासीसेवेत रूजू झाले.
बोईंग ७४७
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.