बॉलीवूड हंगामा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

बॉलीवूड हंगामा हे एक भारतीय मनोरंजन संकेतस्थळ आहे पूर्वी इंडियाएफएम किंवा इंडियाएफएम.कॉम नावाने प्रसिद्ध असलेले हे संकेतस्थळ २००० पासून हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंटच्या मालकीचे आहे.

ही वेबसाइट भारतीय चित्रपटांशी, विशेषतः हिंदी चित्रपटांशी संबंधित बातम्या, समीक्षण आणि बॉक्स ऑफिस अहवाल प्रकाशित करते. १५ जून १९९८ रोजी इंडियाएफएम.कॉम नावाने सुरू झालेल्या या संकेतस्थळाचे नाव २००८ मध्ये बदलून "बॉलीवूड हंगामा" असे ठेवण्यात आले.

याचे मुख्यालय मुंबई येथे आहे.

हंगामा डिजिटल मीडिया ही एक भारतीय डिजिटल मनोरंजन कंपनी आहे, ज्या ही कंपनी पहिल्यांदा १९९९ मध्ये आशिष कचोलिया, हिरेन वेद, लशित संघवी, राकेश झुनझुनवाला आणि नीरज रॉय यांनी ऑनलाइन प्रमोशन एजन्सी म्हणून सुरू केली होती. तेव्हापासून ही कंपनी बॉलिवूड आणि आशियाई मनोरंजनाचे एकत्रीकरणकर्ता, विकासक, प्रकाशक आणि वितरक म्हणूनही काम करत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →