बोनी फ्रान्सिस्का राइट (जन्म १७ फेब्रुवारी १९९१) एक इंग्रजी अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पर्यावरण कार्यकर्त्या आहे. हॅरी पॉटर चित्रपट मालिकेतील जिनी विजली या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे.
लंडनमध्ये जन्मलेल्या राइटने हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन (२००१) आणि हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स (२००२) मध्ये तिच्या व्यावसायिक अभिनयात पदार्पण केले व हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग २ (२०११) या अंतिम चित्रपटापर्यंत दहा वर्षे ही भूमिका साकारली. ह्या लोकप्रिय मालिकेनंतर, राइट स्वतंत्र चित्रपटांमध्ये दिसली, ज्यात बिफोर आय स्लीप (२०१३), द सी (२०१३), आणि आफ्टर द डार्क (२०१४) या चित्रपटांना संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तिने २०१३ मध्ये पीटर उस्टिनोव्हच्या द मोमेंट ऑफ ट्रुथ या नाटकात द साउथवार्क प्लेहाऊसमध्ये मुख्य भूमिकेत नाट्यकलेत पदार्पण केले.
२०१२ मध्ये लंडन कॉलेज ऑफ कम्युनिकेशनमधून फिल्म मेकिंगमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स घेऊन पदवी प्राप्त केल्यानंतर, राइटने तिची स्वतःची निर्मिती कंपनी, बॉनबॉनलुमियरची स्थापना केली आणि लघुपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. डेव्हिड थेवलीस अभिनीत सेपरेट वी कम, सेपरेट वी गो (२०१२) हा तिचा पहिला दिग्दर्शनाचा प्रकल्प होता, जो कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये समीक्षकांनी प्रसिद्ध केला होता व किशोरवयीन विषयावर आधारीत होता. तिने नो दायसेल्फ (२०१६) चे आणि सेक्सटेंट (२०१६) दिग्दर्शन केले होते. राइटची तीन भागांची मालिका, फोन कॉल्स, २०१७ मध्ये ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रकाशीत झाली. तिने ए.एस. बायटच्या द मॅटिस स्टोरीजवर आधारित केरी फॉक्स आणि जेसन आयझॅक्स अभिनीत मेडुसाज अँकल्स (२०१८) प्रकाशीत केले. तिने सोफी लोवे, पीट योर्न आणि स्कारलेट त्योहान्सन या कलाकारांसाठी संगीत व्हिडिओ देखील दिग्दर्शित केले आहेत.
राइटला तिच्या पर्यावरणीय सक्रियतेसाठी ओळख मिळाली आहे. ती ग्रीनपीस आणि लुमोस या धर्मादाय संस्थांची राजदूत आहे.
बॉनी राइट
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.