त्यांच्या इतिहासात, बेल्जियम राष्ट्रीय संघाने १२ शहरी भागांमधील २४ नियमित ठिकाणी सामने खेळले आहेत. बहुतेक वेळा बेल्जियम देशाच्या राजधानी असलेल्या शहर ब्रुसेल्समध्ये खेळले आहेत. या स्टेडीयम ची क्षमता ५००२४ लोकांची असलेले राष्ट्रीय किंग बौडोइन स्टेडियम हे सध्याचे नेहमीचे खेळाचे मैदान आहे. या ठिकाणी रेड डेव्हिल्सचे बहुतांश घरचे सामने खेळले गेले. जेव्हा प्रेक्षकसंख्या खूपच कमी असण्याची शक्यता असते किंवा राष्ट्रीय स्टेडियम दुरुस्तीखाली असते, तेव्हा सामान्यतः इतर (कमी क्षमतेची) स्टेडियम्स यजमान मैदान म्हणून नेमून दिली जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बेल्जियम राष्ट्रीय फुटबॉल संघाचे घरचे मैदान
या विषयावर तज्ञ बना.