बूर्गान्य (फ्रेंच: Bourgogne ; इंग्लिश लेखनभेदः Burgundy, बरजंडी) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य-पूर्व भागात स्थित असून तो ऐतिहासिक बरजंडी प्रांताचा एक भाग आहे. कृषीप्रधान व ग्रामीण स्वरूपाच्या बूर्गान्यमध्ये तुरळक लोकवस्ती आहे. येथील लोकसंख्या घटत चालली असून सरासरी वय वाढते आहे. येथील बरजंडी वाईन जगप्रसिद्ध आहे.
२०१६ साली बूर्गान्य व फ्रांश-कोंते हे दोन प्रदेश एकत्रित करून बूर्गान्य-फ्रांश-कोंते ह्या नव्या प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.
बूर्गान्य
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.