बुलढाणा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बुलढाणा

बुलढाणा शहर हे महाराष्ट्र राज्यातील बुलडाणा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराचे पूर्वीचे नाव 'भिलठाणा' असे होते. त्याचे इंग्रज काळात 'बुलढाणा' असे नामांतर करण्यात आले. हे एक थंड हवेचे ठिकाण होते. आजही विदर्भात सर्वात कमी तापमान बुलडाणा शहराचे असते. बुलडाणा शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात.

१. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३अ मलकापूर - बुलडाणा -जालना- औरंगाबाद आणि

२. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ई अजिंठा-बुलडाणा-खामगाव जातो जो खामगावहुन पुढे अचलपूर मार्गे मध्य प्रदेशातील बैतुल शहरास जातो.

बुलढाणा शहरात तिरुपतीच्या धर्तीवर मलकापूर-बुलडाणा राष्ट्रीय महामार्गावर राजूर घाटात टेकडीवर श्री भगवान बालाजी यांचे नयनरम्य असे मंदिर बांधण्यात आले आहे. जे आज एक प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळ आहे.

"लोणारकर टॉप"

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वांत उंच असलेले शिखर हे लोणारकर टॉप या नावाने ओळखले जाते.

हे शिखर समुद्र सपाटी पासून 928 मीटर उंचीवर आहे.संग्रामपूर तालुक्यातील

पिंपळडोह किल्ला याचे जवळच आहे.

हे शिखर जिल्ह्यात सर्वांत उंच असल्याचे पहिल्यांदा 'लोणारकर टीमने' शोधून जाहीर केले. म्हणून या शिखराला 'लोणारकर टॉप' किंवा 'लोणारकर शिखर' असे नाव पडले आहे.

अंबाबरवा अभयारण्यात शिरल्यावर जटाशंकर मंदिराच्या उत्तरेला असलेल्या डोंगरावर हे शिखर आहे.

तेथे वर त्रिकोणी आकाराचं पठार आहे.

इथून आजूबाजूचा परिसर अतिशय नयनरम्य व अद्भुत दिसतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →