भारतीय संविधानानुसार भारताला कोणतीही अधिकृत राष्ट्रभाषा नाही. परंतु, भारतात २२ अधिकृत भाषा आहेत. देशात हिंदी, बंगाली, मराठी, तेलुगू, तामिळ, गुजराती, कन्नड, ओडिया, मल्याळम, पंजाबी, आसामी या मुख्य भाषा आहेत. संस्कृत, तामिळ, मल्याळम, कन्नड, तेलगू, ओडिया, मराठी, पाली, प्राकृत, बंगाली आणि असमी यांना भारताच्या अभिजात भाषा म्हणून सरकारने घोषित केले आहे.
संसदीय कार्यवाही, न्यायपालिका आणि केंद्र सरकार आणि विविध राज्य शासनातील संवाद यांच्यासारख्या अधिकृत हेतूंसाठी इंग्रजीचा आणि हिंदीचा वापर केला जातो. राज्यशासने त्यांच्या पत्रव्यवहारात इंग्रजी तसेच काही राज्ये हिंदी भाषा वापरतात. भारतातील राज्ये परशिष्टात नमूद केल्यानुसार २२ अधिकृत भाषांना अधिकृत दर्जा देण्यात आला आहे. या सर्व भाषा समान अधिकृत दर्जाची आहेत आणि यापैकी कोणत्याही एका भाषेत शासकीय कागदपत्रे लिहिली जाऊ शकतात. भारताच्या संविधानानुसार देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही.
राष्ट्रभाषा
थोडक्यात पण महत्त्वाचे.