बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ

बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: KUL, आप्रविको: WMKK) हा चीन देशाच्या बीजिंग शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. २०१२ साली बीजिंग राजधानी विमानतळ आशिया खंडामधील सर्वात वर्दळीचा तर अटलांटाच्या हार्ट्सफील्ड-जॅक्सन खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ होता.

जागतिक क्रमवारीमध्ये अत्यंत जलद गतीने वर चढणाऱ्या बीजिंग राजधानी विमानतळामध्ये २००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांसाठी नवा टर्मिनल बांधला गेला. हा टर्मिनल दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलखालोखाल जगातील दुसरा सर्वात मोठा टर्मिनल आहे. सध्या बीजिंग राजधानी विमानतळ हा एर चायना व चायना सदर्न एरलाइन्स ह्या चीनमधील प्रमुख विमान कंपन्यांचा हब आहे. ह्या विमानतळावरील प्रचंड वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी चीन सरकारने २०१९ साली बीजिंग शहराच्या ५० किमी दक्षिणेस बीजिंग दाशिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हा विमानतळ बांधला. हे दोन्ही विमानतळ बीजिंग शहरासोबत बीजिंग सबवेच्या विमानतळ मर्गिकेद्वारे जोडले गेले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →