बीजिंग दाशिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PKX, आप्रविको: ZBAD) हा चीन देशाच्या बीजिंग शहरामधील दोन प्रमुख विमानतळांपैकी एक आहे. २०१९ साली वाहतूकीस खुला करण्यात आलेला हा विमानतळ बीजिंग शहराच्या ५० किमी दक्षिणेस स्थित असून बीजिंग शहरासोबतच तो त्यांजिन शहर व हपै प्रांतालाही विमानसेवा पुरवतो. सुमारे १,१४० कोटी अमेरिकन डॉलर्स इतका खर्च करून बांधण्यात आलेल्या ह्या विमानतळाची इमारत (टर्मिनल) जगातील सर्वात मोठी आहे. ह्या टर्मिनलचे क्षेत्रफळ तब्बल ७५ लाख वर्ग फूट इतके आहे.
बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या बीजिंग शहरातील प्रमुख विमानतळावरील प्रचंड वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी चीन सरकारने २०१९ साली बीजिंग शहराच्या ५० किमी दक्षिणेस बीजिंग दाशिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधला. हे दोन्ही विमानतळ बीजिंग शहरासोबत बीजिंग सबवेच्या विमानतळ मर्गिकेद्वारे जोडले गेले आहेत.
बीजिंग दाशिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?