बिल नाय

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

बिल नाय

विल्यम फ्रान्सिस नाय (जन्म १२ डिसेंबर १९४९, व्यावसायिक नाव बिल नाय) एक इंग्रजी अभिनेता आहे. असंख्य नाटक, दुरचित्रवाणी आणि चित्रपट निर्मितीमधील त्यांच्या कामासाठी ओळखले जाणारे, त्यांना ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि अकादमी पुरस्कार, टोनी पुरस्कार आणि लॉरेन्स ऑलिव्हियर पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळाले आहे.

त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९७७ मध्ये लिव्हरपूलच्या एव्हरीमन थिएटरमधून केली आणि लंडनमध्ये रॉयल नॅशनल थिएटरमध्ये पदार्पण केले ज्याची सुरुवात द इल्युमिनॅटस या नाटकापासून झाली. १९८५ मध्ये डेव्हिड हेअरच्या प्रवदा, १९९१ मध्ये हॅरोल्ड पिंटरच्या बिट्रेयल, १९९३ मध्ये टॉम स्टॉपर्डच्या आर्केडिया आणि १९९४ मध्ये अँटोन चेखोव्हच्या द सीगलमध्ये त्यांच्या भूमिकांमुळे वाहवा मिळविली.

नायच्या सुरुवातीच्या चित्रपट भूमिकांमध्ये कॉमेडी स्टिल क्रेझी (१९९८), गेस्ट हाऊस पॅराडिसो (१९९९) आणि ब्लो ड्राय (२००१) यांचा समावेश आहे. लव्ह ॲक्चूअली (२००३) मधील भूमिकेने तो आंतरराष्ट्रीय स्टारडमवर पोहोचला, ज्याने त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा बाफ्टा पुरस्कार मिळवून दिला. त्याने अंडरवर्ल्ड चित्रपट मालिकेत (२००३-०९) व्हिक्टर आणि पायरेट्स ऑफ द कॅरिबियन चित्रपट मालिकेत (२००६-०७) डेव्ही जोन्सची भूमिका साकारली. त्याच्या इतर चित्रपटांमध्ये शॉन ऑफ द डेड (२००४), द हिचहायकर्स गाइड टू द गॅलेक्सी (२००५), द कॉन्स्टंट गार्डनर (२००५), नोट्स ऑन अ स्कँडल (२००६), हॉट फझ (२००७), वाल्कीरी (२००८), वाइल्ड टार्गेट (२०१०), हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज – भाग १ (२०१०), द बेस्ट एक्सोटिक मॅरीगोल्ड हॉटेल (२०१२), अबाउट टाइम (२०१३), एम्मा (२०२०), आणि लिव्हिंग (२०२२), यांचा समावेश आहे. लिव्हिंग चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →