बालगंधर्व हा इ.स. २०११ साली पडद्यावर झळकलेला, व नितिन चंद्रकांत देसाई याने निर्माण केलेला मराठी चित्रपट आहे. मराठी रंगभूमीवर इ.स.च्या २०व्या शतकात अतिशय लोकप्रिय ठरलेले गायक-अभिनेते नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात बालगंधर्व यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे. सुबोध भावे याने या चित्रपटात बालगंधर्वांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. ६ मे, २०११ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बालगंधर्व (चित्रपट)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!