नितीन चंद्रकांत देसाई

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

नितीन चंद्रकांत देसाई

नितिन चंद्रकांत देसाई (९ ऑगस्ट १९६५ - २ ऑगस्ट २०२३) हे एक भारतीय कला दिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर, चित्रपट व दूरदर्शन निर्माता होते. मराठी आणि हिंदी चित्रपटांतील त्यांचे काम, २०१६ चा दिल्ली येथील जागतिक सांस्कृतिक महोत्सव, हम दिल दे चुके सनम (१९९९), लगान (२००१), देवदास (२००२), जोधा अकबर (२००८) आणि प्रेम रतन धन पायो (२०१५) यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी ते सर्वाधिक प्रसिद्ध होते. वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले. २००२ मध्ये ते चित्रपट निर्माता बनले आणि चंद्रकांत प्रॉडक्शन्स द्वारा देश देवी नावाचा कच्छच्या देवी मातेवर भक्ती चित्रपट त्यांनी काढला.

देसाई यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन वेळा फिल्मफेअर उत्कृष्ट कला दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. २००५ मध्ये त्यांनी ५२ एकर जागेत कर्जत, नवी मुंबई येथे एनडी स्टुडिओ सुरू केला. या स्टुडिओत जोधा अकबर, ट्रॅफिक सिग्नल सारख्या चित्रपटांची निर्मिती झाली आणि कलर्स वाहिनीचा कार्यक्रम बिग बॉस सुरू आहे.

२ ऑगस्ट २०२३ रोजी कर्जतमधल्या त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी आत्महत्या केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →