मेहबूब स्टुडिओ हा एक भारतीय चित्रपट स्टुडिओ आहे जो वांद्रे, मुंबई स्थीत आहे. ह्याची स्थापना १९५४ मध्ये दिग्दर्शक आणि निर्माते मेहबूब खान यांनी केली होती, ज्यांचे आधी मेहबूब प्रॉडक्शन (स्थापना १९४२) होते. हे मदर इंडिया (१९५७) सारख्या चित्रपटांसाठी तो सर्वाधिक ओळखला जातो. ज्याने सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे फिल्मफेर पुरस्कार जिंकले आणि सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकित झाला.
हे २०,००० स्क्वेअर यार्ड (४.२ एकर) मध्ये पसरलेले आहे आणि त्यात चित्रीकरणाचे पाच स्टेज आहेत. ते गुरू दत्त, चेतन आनंद आणि देव आनंद यांसारख्या दिग्दर्शकांमध्ये लोकप्रिय झाले. त्यानंतरच्या दशकांत मनमोहन देसाई यांनी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. १९७० मध्ये इथे रेकॉर्डिंग स्टुडिओ जोडला गेला.
मेहबूब स्टुडियो
या विषयावर तज्ञ बना.