नितीन मुकेश

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

नितीन मुकेश

नितीन मुकेश माथूर हे एक हिंदी चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायक आहेत. त्यांनी चित्रपट गितांव्यतिरिक्त भजने व इतर प्रकारचे गायन देखील केले आहे. पार्श्वगायक मुकेश हे त्यांचे वडील, तर अभिनेते नील नीतिन मुकेश हे त्यांचे पुत्र आहेत. वडील मुकेश यांना श्रद्धांजली म्हणून त्यांनी १९९३ मध्ये युनायटेड स्टेट्ससह आंतरराष्ट्रीय दौरे केले, आणि २००६ मध्ये त्यांच्या कल की यादें या कार्यक्रमासह जागतिक दौरा केला.

नितीन मुकेश यांनी १९८० आणि १९९० च्या दशकात खय्याम, आरडी बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, बप्पी लाहिरी, राजेश रोशन, नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद यांसारख्या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले. त्यांनी विशेष करून मनोज कुमार, शशी कपूर, जितेंद्र, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि इतर कलाकारांना आवाज दिला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →