बाभळगाव हे महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील व तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव लातूर जवळ ७ किमी अंतरावर वसलेले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या घराण्यातील एक पूर्वज "रेेणुकोजी देशमुख" यांनी इ.स.च्या १५ व्या शतकात हे गाव वसवले. आपल्या अभिनयाने भारतभर बाभळगावच नाव गाजविणारे अभिनेते रितेश देशमुख हेही इथलेच आहेत. बाभळगाव हे तावरजा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे.मांगवाडा,मुळे गल्ली,भाडूळे गल्ली, देशमुख गल्ली,कुंभार गल्ली,कलाल गल्ली, दिलीप नगर,भगीरथ नगर आणि अर्जुन नगर हे या गावातील भाग आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बाभळगांव (लातूर)
या विषयावर तज्ञ बना.