बागेरहाट मशिदी शहर बांगलादेशच्या बागेरहाट जिल्ह्यात वसलेले जागतिक वारसा स्थान आहे. १५व्या शतकाच्या दरम्यान बंगाल सल्तनतच्या काळात येथे अनेक मशिदी बांधल्या गेल्या असून त्यापैकी साठ घुमट मशिद सर्वात मोठी आहे. इतर मशिदींमध्ये नऊ घुमट मशिद, चूना खोला मशिद, रोनविजयपुर मशिद, बीबी बेगनी मशिद आणी सिंगैर मशिद यांचा समावेश आहे. उलूग खान जहां उर्फ खान जहां अलीच्या कारकिर्दीत या मशिदी बांधल्या गेल्या. बंगालच्या सुलतान महमूद शहा यांनी सुंदरबनमध्ये शासक म्हणून नेमलेला तो एक तुर्क सैन्य अधिकारी होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बागेरहाटचे मशिदी शहर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.