बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१-२२

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१-२२

बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) खेळण्यासाठी नोव्हेंबर २०२१ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला. दोन्ही संघांनी ही मालिका नोव्हेंबरमध्ये झिम्बाब्वेमध्ये झालेल्या २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी वापरली. झिम्बाब्वे आणि बांगलादेशमधील ही पहिलीच महिला वनडे द्विपक्षीय मालिका होती. बांगलादेश महिलांनी नोव्हेंबर २०१९ दरम्यान पाकिस्तानी महिलांशी खेळल्यानंतर पहिल्यांदाच महिला वनडे सामने खेळले. सर्व सामने बुलावायो मधील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळविण्यात आले.

बांगलादेशी महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ही ३-० अश्या फरकाने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →