बसवराज बोम्मई

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बसवराज बोम्मई

बसवराज बोम्मई (कन्नड: ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ), २८ जानेवारी १९६०) हे भारत देशाच्या कर्नाटक राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकामधील वरिष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा ह्यांचे निकटवर्तीय आहेत.

कर्नाटकमधून यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील टाटा मोटर्स कंपनीत त्यांनी काही वर्षे काम केले. त्यानंतर राजकारणामध्ये शिरून त्यांनी १९९८ ते २००८ दरम्यान कर्नाटक विधानपरिषदेमध्ये कार्य केले. २००८ साली त्यांनी जनता दल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला व ते हावेरी जिल्ह्याच्या शिगाव विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले. त्यानंतर त्यांनी कर्नाटक राज्य सरकार मंत्रीमंडळामध्ये अनेक पदे सांभाळली. २६ जुलै २०२१ रोजी येडियुरप्पा ह्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाने बोम्मई ह्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →