केशवरेड्डी सुधाकर हे एक कर्नाट्क राज्यातील भारतीय राजकारणी आहेत. ते ६ फेब्रुवारी २०२० ते १३ मे २०२३ पर्यंत कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य मंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून २०१८ च्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत चिकबल्लपूर येथून कर्नाटक विधानसभेवर निवडून आले आणि नंतर २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून सभागृहात पुन्हा निवडून आले. त्यांनी २०२३ मध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणूक चिकबल्लपूर येथे भाजपकडून लढवली होती परंतु त्यांना काँग्रेसचे उमेदवार प्रदीप ईश्वर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. मार्च २०२४ मध्ये, त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी चिकबल्लपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून १८व्या लोकसभेत चिक्कबल्लापूर येथून लोकसभेवर निवडून आले.
ते चौथ्या बी.एस. येडियुरप्पा मंत्रालयातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री होते ते पदभार स्वीकारताना केवळ ४६ वर्षांचे होते. त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून काम करत होते. त्यांनी पुन्हा बसवराज बोम्मई यांच्या मंत्रालयात मंत्री म्हणून शपथ घेतली.
केशवरेड्डी सुधाकर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.