जगदीश शेट्टर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

जगदीश शेट्टर

जगदीश शिवप्पा शेट्टर (जन्म १७ डिसेंबर १९५५) हे एक भारतीय राजकारणी आहेत, ज्यांनी २०१२ ते २०१३ पर्यंत कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री म्हणून काम केले. ते कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर त्यांनी कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. २००८-०९ दरम्यान त्यांनी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. २०२३ मध्ये आमदारकीचे तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी भाजप सोडला व ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले होते. काँग्रेसपक्षातून त्यांनी हुबळी-धारवाड मध्यवर्ती विधानसभा जागेचे प्रतिनिधित्व केले. २०२४ मध्ये ते परत भाजप मध्ये आले व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना बेळगाव मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून ते जिंकले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →