विरण्णा सोमण्णा हे २०२४ मध्ये भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालय आणि जलशक्ती मंत्रालयात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले भारतीय राजकारणी आहेत. ते ४ ऑगस्ट २०२१ ते १३ मे २०२३ पर्यंत कर्नाटकच्या गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास विभागाचे मंत्री होते. मे २०१८ ते १३ मे २०२३ पर्यंत ते गोविंदराज नगर मतदारसंघातून कर्नाटक विधानसभेचे सदस्य होते.
१० जून २०१६ रोजी त्यांची कर्नाटक विधान परिषदेवर निवड झाली. त्यांना भाजप आमदारांची ३१ मते मिळाली. मार्च २०२४ मध्ये, त्यांना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप उमेदवार म्हणून तुमकूर मतदारसंघासाठी घोषित करण्यात आले. तुमकूरमधून लोकसभा निवडणूक जिंकून पुढे त्यांची रेल्वे मंत्रालय आणि जलशक्ती मंत्रालय राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.
वीरण्णा सोमण्णा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.