बंगळूर (कन्नड: ಬೆಂಗಳೂರು; मराठीत बंगळूर किंवा बंगळूर; रोमन लिपी: Bengaluru / Bangalore, बेंगलुरू / बॅंगलोर) भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. इ.स. २००६ मध्ये कर्नाटक राज्यशासनाने याचे बेंड-काल-उरू हे नाव बदलून बेंगळूरु असे ठेवले. तरी मराठीत आणि अन्य भारतीय भाषांत या शहराचे नाव बंगळूर असेच समजले जाते. उद्यानांचे शहर किंवा तलावांचे शहर म्हणून बंगळूरचा लौकिक आहे. हे शहर बंगळूर जिल्हा व बंगळूर ग्रामीण जिल्हा अश्या दोन जिल्ह्यांचे प्रशासकीय केंद्र आहे.
बंगळूर शहराला भारताची माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी किंवा भारताची सिलिकन व्हॅली म्हणूनही ओळखले जाते. येथे अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची विकसन केंद्रे आहेत.
बंगळूर
या विषयातील रहस्ये उलगडा.