बनवारीलाल पुरोहित (१६ एप्रिल, १९४० - ) हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे पंजाबचे वर्तमान आणि २९ वे राज्यपाल तसेच चंदीगडचे प्रशासक आहेत. ते २०१७ ते २०२१ पर्यंत तामिळनाडूचे राज्यपाल आणि २०१६ ते २०१७ पर्यंत आसामचे राज्यपाल होते. ते नागपूर लोकसभा मतदारसंघातून ३ वेळा खासदार होते, २ वेळा भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस कडून आणि १ वेळा भाजपकडून. ते नागपुरातील श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाचे अध्यक्ष आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बनवारीलाल पुरोहित
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.