फ्रान्सची दुसरी क्रांती

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

फ्रान्सची दुसरी क्रांती ( फ्रेंच: Révolution de Juillet ), ज्याला जुलै क्रांतीसुद्धा म्हणतात, ही १७८९-९९ च्या पहिल्या फ्रेंच क्रांतीनंतरची दुसरी फ्रेंच क्रांती होती. यामुळे फ्रेंच बूर्बों सम्राट, राजा दहावा शार्लची पदच्युती झाली आणि त्याचा चुलत भाऊ, ओर्लेयोंचा ड्यूक लुई फिलिप, गादीवर बसला, ज्याने फ्रान्सचा शेवटचा राजा म्हणून १८ वर्षे राज्य केले.

१८३० च्या क्रांतीने त्या दिवसापासून एक स्थित्यंतर घडली, कारण जुलै राजेशाहीद्वारे संवैधानिक राजेशाही पुनर्स्थापित झाली; बूर्बों घराण्याचे निश्चितपणे पतन होऊन त्यांचे कनिष्ठ शाखा, ओर्लेयों घराण्याचे वर्चस्व प्रस्थापित झाले; आणि वंशपरंपरागत हक्काच्या तत्त्वाच्या जागी लोकसार्वभौमत्वाचे तत्त्व प्रस्थापित झाले. बूर्बों घराण्याच्या समर्थकांना विधीवादी (Légitimistes) म्हणले जाऊ लागले आणि लुई फिलिपच्या समर्थकांना ओर्लेयोंवादी (Orléanistes) म्हणून ओळखले जाऊ लागले. याव्यतिरिक्त, नेपोलियनच्या वारसांना परत आणण्याचे समर्थन करणारे बोनापार्टवादी (Bonapartistes) सुद्धा होते. सिंहासनावरील १८ अस्थिर वर्षांनंतर, फ्रान्सच्या तिसऱ्या क्रांतीत लुई-फिलिप यांना पदच्युत केले आणि त्याच वर्षी लुई नेपोलियनने बोनापार्टवाद्यांना पुन्हा सत्तेवर आणले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →