ऑस्ट्रियाची ॲन

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

ऑस्ट्रियाची ॲन

ऑस्ट्रियाची ॲन (मूळ नाव:आना मारिया मॉरिसिया; फ्रेंच: ॲन दॉत्रिच; स्पॅनिश: आना दि ऑस्त्रिया; २२ सप्टेंबर, १६०१ – २० जानेवारी, १६६६:पॅरिस, फ्रांस) ही १६१५ ते १६४३ पर्यंत फ्रांसची राणी होती. तिचा विवाह राजा लुई तेरावा यांच्याशी झाला होता. १६२० तिच्या पतीच्या मृत्यूनंतर १६५१ पर्यंत तिने आपल्या अल्पवयीन मुलगा लुई चौदावा याच्या नावाने राज्यकारभार चालवला.

वयाच्या अकराव्या वर्षी अ‍ॅनचा फ्रांसचा राजा लुई तेरावा याच्याशी लग्न ठरले. या वेळी तिच्या वडिलांनी तिला हुंड्यात ५,००,००० क्राउन आणि अनेक सुंदर दागिने दिले. लुई तेराव्याची तब्येत नाजुक असल्याने स्पॅनिश दरबाराने या लग्नासाठी अट घातली की जर लुई अकाली मरण पावला तर अ‍ॅन तिचा हुंडा, दागिने आणि कपडे घेऊन स्पेनला परत येईल. लग्नापूर्वी अ‍ॅनने ऑस्ट्रियाच्या राज्यावरील स्वतःचा आणि लुई पासून होणाऱ्या तिच्या वंशजांचे सर्व वारसाहक्क सोडून दिले परंतु अशी तरतूद केली गेली की जर ती निपुत्रिक विधवा राहिली तर तिला तिचे हक्क परत मिळतील. १८ ऑक्टोबर १६१५ रोजी लुई आणि अ‍ॅन यांचे बर्गोसमध्ये दूरस्थ लग्न लागले. त्याच सुमारास लुईची बहीण फ्रांसची एलिझाबेथ आणि अ‍ॅनचा भाऊ स्पेनचा चौथा फिलिप यांचे लग्न बोर्दूमध्ये असेच दूरस्थ लग्न लागले. हे विवाह फ्रान्स आणि स्पेनमधील लष्करी आणि राजकीय संबंध दृढ करण्याच्या परंपरेतील होते. अशा विवाहांची परंपरा १५५९ मध्ये स्पेनचा फिलिप दुसरा आणि व्हालवाची एलिझाबेथ यांच्या लग्नाने सुरू झाली होती. अ‍ॅन आणि एलिझाबेथची देवाणघेवाण स्पेन आणि फ्रांसच्या मधील एक बेटावर झाली. ती तिच्या तारुण्यात सुंदर होती. ती उत्तमप्रकारे घोडेस्वार देखील होती. तिचा मुलगा चौदाव्या लुईला तिने हा वारसा दिला होता. लग्नाआधी व नंतरही अ‍ॅनचे अनेक चाहते होते, ज्यात बकिंगहॅमचा ड्यूक देखील होता. तिच्या जवळच्या लोकांना वाटत होते की अ‍ॅन इतर पुरुषांशी थट्टामस्करी करीत असली तरी ती बाहेरख्याली नव्हती. इतिहासकार डेसमंड सुअर्ड यांच्या लिखाणानुसार १६२५मध्ये बकिंगहॅम फ्रांसला आलेला असताना तो राणी संध्याकाळी फिरायला जात असलेल्या एका खाजगी बागेत चढला आणि कदाचित तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्नही केला असावा. अ‍ॅनने तेव्हा आरडाओरडा करून तिच्या सेवकांना बोलावून घेतले.



चौदा वर्षांच्या अ‍ॅन आणि लुई यांच्यावर लग्न रद्द होण्याची शक्यता टाळण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव आणला गेला परंतु लुईने त्याच्या पत्नीकडे दुर्लक्षच केले. लुईची आई मरिया दे मेदिचीने सुद्धा तिला बाजूला टाकल्यासारखे केले. इकडे अ‍ॅन इनेस दि ला तोरे आणि इतर स्पॅनिश सख्यांच्या मदतीने आपल्या स्पॅनिश पद्धतीने राहिली. तिने आपले मोडकेतोडके फ्रेंच सुधारण्याचा प्रयत्नही केला नाही.

कालांतराने १६१९ मध्ये राजाला त्याच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा राणीबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. त्याच सुमारास अ‍ॅन आजारी पडली. या काळत लुईला तिच्याविषयी प्रेम निर्माण झाले

यानंतर अ‍ॅनचे अनेक गर्भपात झाल्याने त्यांच्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला.

अशातही राणी पुन्हा एकदा गर्भवती झाली. किंवा इतिहासकारांच्या मते, मागील महिन्यात कधीतरी झालेल्या शाही दौऱ्यामुळे घडली. लुई चौदावाचा जन्म ५ सप्टेंबर १६३८ रोजी झाला आणि बर्बन वंश पुढे जाणे शक्य झाले. गॅझेट दि फ्रांस या अधिकृत वृत्तपत्राने याला अनपेक्षित चमत्कार म्हणले.

१६४३ मध्ये लुईच्या मृत्यूनंतर अ‍ॅन चौदाव्या लुईच्या वतीने कारभारी झाली.



१६६४मध्ये अ‍ॅनचा आजार बळावला तेव्हा ती व्हाल-दि-ग्रासच्या कॉन्व्हेंटमध्ये रहायला गेली. २० जानेवारी १६६६ रोजी तेथे कर्करोगाने तिचे निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →