नोत्र देम दे रेंस

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

नोत्र देम दे रेंस

नोत्र देम दे रेंस ; (अर्थ " रेंसची आमची माता "), ज्याला रेंस कॅथेड्रलसुद्धा म्हणतात, हे रेंसमधील एक कॅथलिक कॅथेड्रल आहे, जे रेंसच्या अर्चडाओसेसचे केंद्र आहे. हे कॅथेड्रल कुमारी मारियेला समर्पित होते आणि फ्रान्सच्या राजांच्या राज्याभिषेकासाठी हे पारंपरिक ठिकाण होते. हे कॅथेड्रल गॉथिक वास्तुकलेच्या सर्वात महत्त्वाच्या कलाकृतींपैकी एक मानले जाते. हे एक प्रमुख पर्यटन स्थळ असून, येथे दरवर्षी सु. दहा लाख पर्यटक येतात. १९९१ मध्ये ते UNESCO चे जागतिक वारसा स्थान झाले

असे मानले जाते की या कॅथेड्रलची स्थापना ५ व्या शतकाच्या सुरुवातीला बिशप निकासिउस यांनी केली होती. सुमारे एका शतकानंतर, रेंसचे बिशप संत रेमी यांनी येथे क्लोव्हिसला ख्रिस्ती बाप्तिस्मा दिला. हा संस्कार ग्रहण करणारा तो पहिला फ्रांकी राजा होता. सध्याच्या कॅथेड्रलचे बांधकाम १३ व्या शतकात सुरू झाले आणि १४ व्या शतकात पूर्ण झाले. उच्च गॉथिक वास्तुकलेचे एक प्रमुख उदाहरण असलेले हे चर्च, १२१० मध्ये आगीत नष्ट झालेल्या पूर्वीच्या चर्चच्या जागी बांधले होते. फ्रेंच क्रांतीदरम्यान फारसे नुकसान झाले नसले तरी, सध्याच्या कॅथेड्रलचा १९व्या शतकात मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार केला. पहिल्या महायुद्धादरम्यान त्याचे मोठे नुकसान झाले होते आणि २० व्या शतकात त्याची पुन्हा पुनर्बांधणी केली.

१९०५ च्या धर्म आणि राज्य विभक्तीकरणाच्या कायद्यानुसार, कॅथेड्रलची मालकी फ्रेंच राज्याकडे आहे, तर कॅथोलिक चर्चकडे त्याच्या विशेष वापरासाठी एक करार आहे. फ्रेंच सरकार त्याच्या जीर्णोद्धार आणि देखभालीसाठी पैसे देते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →