फ्रांसिस एडवर्ड रॉडोन-हेस्टिंग्स, हेस्टिंग्सचा पहिला मार्क्वेस तथा लॉर्ड रॉडोन किंवा द अर्ल ऑफ मोइरा (९ डिसेंबर, १७५४ – २८ नोव्हेंबर, १८२६) एक आंग्ल-आयरिश राजकारणी आणि लष्करी अधिकारी होता. हा १८१३ ते १८२३ दरम्यान भारताचा गव्हर्नर-जनरल होता. याआधी त्याने अमेरिकन क्रांतिकारी युद्धादरम्यान आणि १७९४ मध्ये पहिल्या युतीच्या युद्धादरम्यान ब्रिटिश सैन्यात सेवा बजावली होती. आयर्लंडमध्ये, त्यांनी प्रातिनिधिक सरकार आणि राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठीची संयुक्त आयर्लंड चळवळ मोडून काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जबरदस्तीच्या धोरणावर टीका केली होती. १७९० मध्ये त्याने त्याचे मामा हंटिंगडनचे १० वे अर्ल फ्रान्सिस हेस्टिंग्ज इच्छेनुसार हेस्टिंग्स हे अतिरिक्त आडनाव लावायला सुरुवात केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फ्रांसिस रॉडोन-हेस्टिंग्स (हेस्टिंग्सचा पहिला मार्क्वेस)
या विषयावर तज्ञ बना.