जेम्स अँड्र्यू ब्राउन-रामसे तथा लॉर्ड डलहौसी (२२ एप्रिल १८१२ - १९ डिसेंबर १८६०); १८३८ ते १८४९ दरम्यान द अर्ल ऑफ डलहौसी म्हणून ओळखला जातो, हा ब्रिटिश भारतातील एक स्कॉटिश राजकारणी आणि प्रशासक होता. १८४८ ते १८५६ पर्यंत त्याने भारताचा गव्हर्नर-जनरल म्हणून काम केले.
उच्च शिक्षणाबरोबरच मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोकांना शिक्षण सुरू करून त्याने भारतातील आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा पाया रचला. त्याने रेल्वेच्या प्रवासी गाड्या, इलेक्ट्रिक टेलीग्राफ आणि एकसमान टपाल व्यवस्था सुरू करून दिली, ज्याचे वर्णन तो "सामाजिक सुधारणेचे तीन महान इंजिन" करायचा. त्याने भारतात सार्वजनिक बांधकाम विभागाची देखील स्थापना केली. त्याच्या समर्थकांसाठी तो दूरदृष्टी असलेला गव्हर्नर-जनरल आहे, ज्याने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची राजवट मजबूत केली आणि प्रशासनाचा पाया घातला. त्याच्या ठोस धोरणांमुळे त्याचे उत्तराधिकारी बंडखोरीची लाट रोखू शकले.
त्याच्याच काळात वूडचा खलिता आला ज्याला आपण भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा म्हणतो.
त्याचा भारतातील शासनाचा काळ भारतीय प्रशासनाच्या व्हिक्टोरियन राज कालावधीत परिवर्तन होण्यापूर्वीचा होता. त्याच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी ब्रिटनमधील अनेकांनी त्याचा निषेध केला कारण १८५७ च्या उठावाची चिन्हे लक्षात घेण्यात तो अयशस्वी झाला होता. तसेच त्याचा अतिआत्मविश्वास, केंद्रीकरण क्रियाकलाप आणि विस्तारित संलग्नीकरणामुळे उठावाचे संकट जास्त वाढले.
लॉर्ड डलहौसी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.