फोक्सवागन

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

फोक्सवागन ही जर्मनीतील वाहन उत्पादन करणारी अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यलय वोल्फ्सबुर्ग (लोअर सॅक्सनी राज्यात) असून कंपनीची स्थापना १९३७ साली झाली. फाउ-वे (VW) या संक्षिप्तनामानेही कंपनीची ओळख आहे. . फोक्सवागनच्या कंपनी समूहात अनेक वाहन उत्पादक आहेत व त्यातील काही वाहन उत्पादनात अतिशय प्रसिद्ध आहेत. ऑडी, बेंटले मोटर्स, बुगाटी ऑटोमोबाईल्स, फियाट, स्कोडा ऑटो, पोर्शे व अवजड वाहने बनवणारे स्कानिया ही उत्पादके फोल्क्सवागन उत्पादन समूहात मोडतात.

फोक्सवागन या शब्दाचा अर्थ जनसामान्यांचे 'दास ऑटो' हे कंपनीचे ब्रीदवाक्य आहे.

नोव्हेंबर २००९ मध्ये फोक्सवागन व पोर्शे या वाहन उत्पादक समूहाने टोयोटाची वाहन उत्पादकांमधील मक्तेदारी मोडून काढून सध्याचा सर्वाधिक वाहन विक्रेता समूह म्हणून नावाजला आहे.

एकविसाव्या शतकात फोक्सवागनने भारतातही पाऊल रोवले असून वाहनांच्या विक्रिला प्रारंभ केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →