श्टुटगार्ट

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

श्टुटगार्ट

स्टुटगार्ट ही जर्मनीच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्याची राजधानी आहे. हे जर्मनीमधले ६ वे सर्वात मोठे शहर आहे. युरोपातील एक महत्त्वाचे ऑद्योगिक केंद्र म्हणून या शहराची गणना होते. वाहन उद्योगाकरता प्रसिद्ध असूनही या शहराच्या आजूबाजूला निसर्गरम्य टेकड्या आहेत.

या शहराची लोकसंख्या ५९०४२९ (फेब्रुवारी २००८) इतकी आहे. या शहराला स्वायत्त शहराचा दर्जा आहे. बाडेन-व्युर्टेनबर्ग या राज्याची राजधानी असल्याने येथे राज्याचे विधान भवन आहे.

प्रोटेस्टंट तसेच कॅथोलिक ख्रिश्चन धर्मांची प्रमुख चर्चे येथे बघायला मिळतात.

युरोपातील इतर प्रमुख शहरांशी दळणवळण वाढवण्याकरता शहराने 'स्टुटगार्ट २१' या प्रकल्पाखाली 'दास न्यॉय हेर्झ युरोपास' (अनुवादः युरोपाचे नवे हृदय) असे नवे नाव धारण केले आहे.

मर्सेडिज बेंझ या जगप्रसिद्ध स्वयंचलित वाहने बनवणाऱ्या कंपनी डायमलर आ. गे.चे संस्थापक श्री गोटलिब डाइमलर यांनी जगातील सर्वात स्वयंचलित वाहन याच शहरात बनवले. सध्याचे डायमलर कंपनीचे मुख्यालय व पोर्शे या अतिजलद स्वयंचलित वाहने बनवणाऱ्या कंपनीचे मुख्यालय स्टुटगार्टमध्ये आहे. तसेच बाँश, बेहेर, माह्-ले, या वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यादेखील याच शहरात सुरू झाल्या. या प्रमुख उद्योगसमूहांच्या मुख्यालयांबरोबर त्यांचे उत्पादन करणारे कारखाने या शहराची शान वाढवतात.

शहराचा इतिहास साधारणपणे १० व्या शतकापासून ज्ञात आहे. मध्ययुगातील रोमन सम्राट ओटो याची घोड्यांची मोठी पागा या शहरात होती. त्यामुळे याचे नाव स्टुटगार्ट (स्वैर अनुवादः घोड्यांची पागा) असे पडले. हा प्रदेश जर्मनीमधे 'श्वाबिश' प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जर्मन भाषेप्रमाणेच येथील स्थानिक लोक 'श्वेबिश' ही बोली भाषा बोलतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →