कॉलोराडो स्प्रिंग्ज हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक प्रमुख शहर आहे. हे शहर एल पासो काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. या शहराला नुसते स्प्रिंग्ज असेही संबोधतात.
कॉलोराडो स्प्रिंग्ज हे कॉलोराडो राज्याच्या भौगोलिक मध्यस्थानाच्या किंचित पूर्वेस व राज्याची राजधानी डेन्व्हरमधील स्टेट कॅपिटोलपासून १०१ कि.मी. दक्षिणेस वसलेले आहे. स्प्रिंग्ज समुद्रसपाटीपासून १,८३९ मी. (६,०३५ फूट) उंचीवर आहे व शहरातील वस्तीचा काही भाग ६,८०० फूटांपर्यंत उंचीवर आहे. हे शहर रॉकी माउंटन्स या पर्वतमालेच्या पूर्व सीमेवर पाइक्स पीक या अमेरिकेतील सगळ्यात प्रसिद्ध डोंगरांपैकी एकाच्या पायथ्याशी आहे.
अमेरिकेच्या वस्तीगणना केंद्राच्या अंदाजानुसार कॉलोराडो स्प्रिंग्ज शहरात ३,६९,८१५ व्यक्ती राहतात तर स्प्रिंग्जच्या नागरी भागाची वस्ती ५,८७,५०० आहे. या आकड्यांनुसार स्प्रिंग्ज हे अमेरिकेतील ४९वे मोठे शहर आहे.
कॉलोराडो स्प्रिंग्ज गावाची स्थापना इ.स. १८७१मध्ये श्रीमंत लोकांचे सुट्टी घालवण्याचे ठिकाण म्हणून झाली होती. कालांतराने जवळच्या सोने व चांदीच्या खाणींना बरकत आली व शहराचेही रूप बदलले. सद्यस्थितीत कॉलोराडो स्प्रिंग्ज हे सैनिकी व प्रवासी व थंड हवेचे ठिकाण झालेले आहे. मनी या नियतकालिकाच्या मते कॉलोराडो स्प्रिंग्ज हे अमेरिकेतील ३,००,००० किंवा अधिक वस्ती असलेल्या शहरांपैकी राहण्यासाठी प्रथम क्रमांकाचे शहर आहे.
कॉलोराडो स्प्रिंग्ज
या विषयातील रहस्ये उलगडा.