बजाज ऑटो लिमिटेड आहे भारतीय दुचाकी कंपनी आहे. ही कंपनी जगभर दुचाकी आणि तीन चाकी वाहने विकते. या कंपनीचे तिन चाकी गाड्यांचा कारखाना पुणे येथे स्थित आहे. ही कंपनी मोटारसायकली, स्कूटर आणि ऑटो रिक्षा तयार करते . बजाज ऑटो हा बजाज ग्रुपचा एक भाग आहे. राजस्थानात जमनालाल बजाज यांनी १९४० च्या दशकात याची स्थापना केली होती. हे पुणे, महाराष्ट्रात असून, चाकण ( पुणे ), वाळूज ( औरंगाबाद जवळ) आणि उत्तराखंडमधील पंतनगर येथे कारखाने आहेत. आकुर्डी ( पुणे ) येथील सर्वात जुना कारखाना आणि आर अँड डी सेंटर आहे.
बजाज ऑटो ही मोटारसायकली बनविणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. ही जगातील सर्वात मोठी तीन चाकी वाहन निर्माता कंपनी आहे.
बजाज ऑटो
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!