फेर्दिनांद द सोस्यूर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

फेर्दिनांद द सोस्यूर (१८५७ - १९१३) हा स्विस भाषाशास्त्रज्ञ होता. त्याचा ‘कोर्स इन जनरल लिंग्विस्टिक्स’ (सामान्य भाषाविज्ञान) हा ग्रंथ १९१६ मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध केला. या ग्रंथातील त्याचे विचार म्हणजे मुळात त्याची विविध व्याख्याने होत. त्या व्याख्यानातील सोस्यूरचे संशोधन अत्यंत मूलभूत व मौलिक आहे. त्यामुळे हा आधुनिक भाषाविज्ञानातील मूलभूत ग्रंथ मानला जातो आणि सोस्यूरला आधुनिक भाषाविज्ञानाचा जनक म्हटले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →