वर्णनात्मक भाषाविज्ञानास एककालिक वर्णनात्मक विज्ञान असेही म्हणतात. या भाषाविज्ञानात कोणत्याही एकाच कालखंडातील व बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास केला जातो. एकाच कालखंडातील भाषा अभ्यासासाठी घेतल्यामुळे या पद्धतीला 'एककालिक अभ्यासपद्धती' असेही म्हटल्या जाते. अ एकाच काळातील भाषेचे वर्णन केले जाते म्हणून त्यास 'वर्णनात्मक भाषाविज्ञान' असे म्हणतात.
आधुनिक भाषाविज्ञानात ऐतिहासिक पद्धतीचे विश्लेषण टाळून वैज्ञानिक पद्धतीच्या संकल्पना वा भाषातत्त्वे विकसित करणे ही भूमिका वर्णनात्मक भाषाविज्ञानाने स्वीकारली आहे. भाषेच्या एककालिक अभ्यासाला महत्त्व आणि त्याच्या संरचनेचा अभ्यास हा वर्णनात्मक भाषाविज्ञानाचा विशेष होय.
फेर्दिना द सोस्यूर या स्विस अभ्यासकाने आधुनिक भाषाविज्ञानाचा पाया घातला असे म्हणले जाते. त्याने भाषाभ्यासात रूप व्यवस्था व संरचना या अमूर्त संकल्पनांना महत्त्व दिले. तसेच पारंपरिक व्याकरणाच्या मूल्यमापनाला विरोध करून ऐतिहासिक दृष्टिकोणापेक्षा एककालिक व संरचनात्मक भाषाविल्शेषणाचे विवेचन केले. भाषा एक चिन्हव्यवस्थाआहे, असे त्याने प्रतिपादन केले. अशाप्रकारे भाषेच्या चिन्हव्यवस्थेचे श्रेय सोस्यूरकडेच जाते.
वर्णनात्मक भाषाशास्त्र
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.