फिरेंझे सांता मरिया नोव्हेल्ला रेल्वे स्थानक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

फिरेंझे सांता मारिया नोव्हेला तथा फ्लोरेन्स सांता मारिया नोव्हेला किंवा स्ताझ्झियोने दि सांता मारिया नोव्हेला हे इटलीतील फिरेंझे (फ्लोरेन्स) शहराचे मुख्य रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाचा वापर दरवर्षी ५.९ कोटींहून अधिक प्रवाशांकडून वापरात असलेले हे इटलीतील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.

हे स्थानक २६ मे १९९२ रोजी पूर्ण झालेल्या फिरेंझे-रोम हाय-स्पीड रेल्वे मार्गाच्या उत्तर टोकाला आणि २२ एप्रिल १९३४ रोजी सुरू झालेल्या बोलोन्या-फिरेंझे रेल्वे मार्गाच्या दक्षिण टोकाला स्थित आहे. बोलोन्यासाठी नवीन जलदगती मार्ग १३ डिसेंबर २००९ रोजी सुरू करण्यात आला. या स्थानकाचा वापर स्थानिक व प्रादेशिक गाड्यांसाठीही केला जातो. यांत पिसा]], लिव्होर्नो (लिओपोल्डा रेल्वे); लुक्का, व्हियारेगियो (व्हियारेगियो-फिरेंझे रेल्वे); बोलोन्या (बोलोन्या-फिरेंझे रेल्वे) आणि फाएन्झा (फेन्तिना रेल्वे) हे मार्ग समाविष्ट आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →