रोमा टर्मिनी रेल्वे स्थानक

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

रोमा टर्मिनी रेल्वे स्थानक

रोमा टर्मिनी ( इटालियन: स्ताझ्झिओनी तर्मिनी) (आहसंवि: XRJ) हे इटलीची राजधानी रोम शहराचे मुख्य रेल्वे स्थानक आहे. हे इटलीचे सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे आणि युरोपमधील पाचवे सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे, दरवर्षी येथे अंदाजे १५ कोटी प्रवासी येतात, आणि दररोज ८५० गाड्या ये-जा करतात.



या स्थानकावरून इटलीतील सर्व प्रमुख शहरांना नियमित रेल्वे सेवा उपलब्ध आहे, तसेच म्युनिक, जिनीव्हा आणि व्हिएन्नाला रोज आंतरराष्ट्रीय सेवा देखील उपलब्ध आहेत. दरवर्षी १५ कोटी प्रवासी रोमा टर्मिनी वापरतात आणि दररोज ८५० गाड्या स्टेशनमधून ये-जा करतात. ३२ फलाट असलेले रोमा टर्मिनी हे युरोपमधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. पॅरिसच्या गारे दु नॉर्द आणि म्युनिकच्या म्युंशेन एचबीएफ स्थानकांमधूनही प्रत्येकी ३२ फलाट आहेत. जोडलेले आहे.

रोमा टर्मिनी रोममधील सार्वजनिक वाहतुकीचे सुद्धा मुख्य केंद्र आहे. टर्मिनी मेट्रो स्थानकावर दोन रोम मेट्रो सेवा (अ आणि ब) एकमेकांना छेदतात. स्थानकासमोरील पियाझा देई चिंक्वेचेंतो येथे शहराचे प्रमुख बस स्थानक आहे. शहराच्या मुख्य ट्राम सेवा स्थानकापासून १.५ किमी अंतरावार पोर्ता मॅजिओरे येथे आहेत

२३ डिसेंबर २००६ रोजी, हे स्टेशन पोप जॉन पॉल दुसरे यांना समर्पित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →