फास्टर फेणे हा २०१७ चा आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मराठी भाषेतील क्राइम-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात भा.रा. भागवत यांनी तयार केलेल्या बनेश फेणे/फास्टर फेणे ह्या व्यक्तिरेखेवर आधारित फास्टर फेणेच्या भूमिकेत अमेय वाघ आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते गिरीश कुलकर्णी नकारात्मक भूमिकेत आहेत. इतर कलाकारांमध्ये पर्ण पेठे, चिन्मयी सुमित, दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ जाधव हे सहाय्यक भूमिकेत आहेत. दिलीप प्रभावळकर हे भास्कर रामचंद्र भागवत यांची भूमिका साकारत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फास्टर फेणे (चित्रपट)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.